HW News Marathi
क्राइम

कार्यालयात होणाऱ्या शोषणाबाबत महिलांचे मौन

हैदराबादकार्यालयांमहिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. तरीही या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पीडित स्त्रिया पुढे येत नाहीत. देशभरातील सुमारे ७० टक्के पीडित महिला तक्रारच करीत नसल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सतबीर बेदी यांनी म्हटले आहे.तेलंगण महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एक दिवसीय चर्चासत्रात त्यांनी ही माहिती दिली.अनेक महिलांचे कार्यालयात लैंगिक शोषण होते. मात्र त्याविरोधात त्या कधीही तक्रार करीत नाहीत. कार्यालयीन शोषणापासून संरक्षण व्हावे, यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांचा महिला उपयोग करीत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण; मुंबई पोलिसांनी डिझायनरला उल्हासनगरमधून घेतले ताब्यात

News Desk

बदलापुरात लहानग्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

News Desk

“शेतकऱ्यांच्या मृत्यूवर PM मोदी गप्प का”? – कन्हैया

News Desk