HW News Marathi
क्राइम

अफगान सरकार झुकले, सत्ता सोपवणार ?

काबुल | तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलला वेढा घातला आहे. अफगान सरकारच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला पृष्टीही दिली आहे. त्यामुळे तालिबान्यांच्या हाती सत्ता सोपवण्यावर अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात चर्चा सुरू असून कोणत्याही क्षणी हे सत्तेचं सत्तांतर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. न्यूज एजन्सी एपीच्या नुसार तालिबानचे दूत अफगानच्या राष्ट्रपती भवनात जात आहेत. राष्ट्रपती भवनात जाऊन ते सत्ता परिवर्तनावर चर्चा करतील.

तालिबानकडून सत्ता परिवर्तनाची मागणी

तालिबानने सत्ता परिवर्तनाची मागणी केली आहे. त्यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी शिक्कामोर्तब केला आहे. काबुलवर हल्ला होणार नाही. सत्ता परिवर्तन शांततेने होईल. काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी सेक्युरिटी फोर्सवर आहे, असं मिर्जकवाल यांनी म्हटल्याचं टोलो न्यूजच्या वृत्तात म्हटलं आहे.तालिबानला ताकदीच्या बळावर काबुलवर सत्ता बदल घडवून आणायचा नाही. आम्हाला सत्तांतर हवं आहे. सत्ता परिवर्तन शांततेत होत असेल तर आमच्याकडून कोणतीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, असं तालिबानने म्हटलं आहे.

लष्कराची हेलिकॉप्टर आकाशात फिरू लागली असल्याचंही निदर्शनास आलं

तालिबानने त्यांच्या समर्थकांना काबूलच्या चहूबाजूनं थांबण्यास सांगितलं आहे. काबूलवर ‘बळाचा वापर करुन’ काबीज करु नये, असे तालिबानकडून त्यांच्या समर्थकांना आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी, रविवारी सकाळी सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना अचानक घरी पाठवण्यात आल्याची बातमी आली होती. लष्कराची हेलिकॉप्टर आकाशात फिरू लागली असल्याचंही निदर्शनास आलं. दरम्यान, तालिबानने जलालाबाद ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी अमेरिकेची हेलिकॉप्टर रविवारी येथील अमेरिकन दूतावासावर उतरली आहेत.दरम्यान, सीमेवर कोणत्याही प्रकारचा संघर्ष सुरू नाही. तालिबानच्या अतिरेक्यांनी कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. त्यामुळे सरकारचं टेन्शन वाढलं आहे. त्याचा परिणाम म्हणून सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुपारीच घरी पाठवण्यात आलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

Aprna

श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna