वाराणसी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (२५ एप्रिल) ‘रोड शो’ला सुरुवात झाली आहे. मोदींनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रांगाणातील पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य रोड शोला प्रारंभ केला आहे. मोदी उद्या (२६ एप्रिल) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोदींच्या रोड शोसाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. जगप्रसिद्ध दशाश्वमेघ घाटावर गंगा आरतीत सहभागी होणार असून गंगा आरतीनंतर मोदी काशी विश्वनाथाचे दर्शन करणार आहेत.
#WATCH Varanasi: Prime Minister Narendra Modi pays tribute to Pt Madan Mohan Malaviya, outside Banaras Hindu University (BHU) pic.twitter.com/1ivDSQ5vhw
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 25, 2019
नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो अस्सी मोड, मुमुक्षु भवन, आनंदमयी हॉस्पिटल, शिवाला तिराहा, सोनारपुरा, जगमबाडीमधून गोदौलिया, असा रोड शो असणार आहे. या रोड शो साठी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावले आहेत. शहरात मोदींच्या स्वागताचे फलक जागोजागी लावले गेले आहेत. या रोड शोच्या वेळी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला आहे. या शो साठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित असणार आहेत.
Visuals from Prime Minister Narendra Modi’s roadshow in Varanasi. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/YSAjYbWHx8
— ANI UP (@ANINewsUP) April 25, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.