HW News Marathi
महाराष्ट्र

नौका उलटली; पण मोबाइलने तारले

सिंधुदुर्ग मासेमारीसाठी गेलेली एक नौका येथील मालवणच्या समुद्रात शुक्रवारी सकाळी बुडाली. नौका बुडाल्याचा मोबाइल कॉल आल्यानंतर किना-यावरील अन्य मासेमारांनी तत्परता दाखवल्यामुळे नौकेतील पाचही मासेमारांचे प्राण वाचवून त्यांना सुखरूप दांडी किनाऱ्यावर आणण्यात यश आले.

समुद्रात बुडालेल्या अवस्थेत बोटींचा आधार घेत एका मच्छीमाराने मोबाइल कॉल करून किनाऱ्यावरीलमासेमारांना दुर्घटनेची माहिती दिली. किनाऱ्यावरील मासेमार ४ ते ५ बोटी घेऊन समुद्रात शिरले. बुडालेल्यामासेमारांनी अंगावरील टी शर्ट उंचावून आपण नेमके कुठे आहोत, याची खूण केली. त्यानंतर अन्य बोटीवरीलमासेमारांनी त्यांना वाचवले. दोरखंड बांधून बुडालेली नौकाही अन्य नौकांच्या मदतीने ४ तासांच्या प्रयत्नानंतर किनाऱ्यावर आणण्यात आली. या दुर्घटनेत नौकेचे जाळी व इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीसजी काय राव तुम्ही तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण घराबाहेर यावं लागतं”, चित्रा वाघ यांचा टोमणा

News Desk

BBC विरोधात विधानसभेत ठराव मंजूर; केंद्र पाठोपाठ राज्याचा दणका

Aprna

वटहुकूम आणि घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी, संभाजीराजेंची मागणी

News Desk