HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

BBC विरोधात विधानसभेत ठराव मंजूर; केंद्र पाठोपाठ राज्याचा दणका

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) आजचा शेवटचा दिवस आहे. बीबीसीच्या डॉक्युमेंटरी (BBC Documentary) विरोधात विधानसभेत आज (25 मार्च) प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसबेत बीबीसीच्या पंतप्रधान मोदींच्या डॉक्युमेंटरी विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे.

या डॉक्युमेंटरीमध्ये गुजरात दंगलीवरून मोदींवर आरोप करत अनेक सवाल केले होते. यामुळे देशात भाजपविरोधात संतापाची लाट निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर बीबीसीची पंतप्रधानावरील डॉक्युमेंटरी देशभरात प्रदर्शनावर केंद्र सरकारने बंदी घातली होती. गुजरातमध्ये 2002 झालेल्या हिंसाचार आणि दंगलीच्या वेळी मोदी हे मुख्यमंत्री होती. यावेळी झालेल्या दंगलीवर आधारीत बीबीसीची डॉक्युमेंटरी होती.

गुजरामध्ये 2002 येथे गोध्रा येथे ट्रेन जाळल्याने मोठी दंगल उसळली होती. या घटनेवर तत्कालीन राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. यावेळी मोदी हे गुजराचे मुख्यमंत्री होते. यामुळे मोदींच्या भूमीकेवर बीबीसीच्या डॉक्युमेंट्ररीने प्रश्न उपस्थित केले होते.  हा भारत सरकारचा अपप्रचार असल्याचे सांगत बीबीसी डॉक्युमेंट्ररीवर बंदी आणली.

 

Related posts

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Manasi Devkar

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला निषेध नोंदवावा! – अजित पवार

Aprna

निवडणूक वर्षात ‘दारूकामा’चा जीवघेणा धंदा रोखण्याचा ‘जोश’ सरकार दाखविणार ?

News Desk