HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी मतदानाच्या दिवशी केलेल्या ‘रोड शो’चा अहवाल आयोगाने मागविला

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२३ एप्रिल) अहमदाबादमध्ये मतदानाच्या दिवशी केलेल्या ‘रोड शो’संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरातमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून (सीईओ) अहवाल मागितला आहे. ‘रोड शो’दरम्यान पंतप्रधानांनी निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा कांग्रेस पक्षाने आरोप केला. त्यानंतर आयोगाने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे.

अहमदाबादमध्‍ये लोकसभेच्‍या तिसर्‍या टप्‍प्‍यातील मतदान पार पडले आहे. यावेळी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा म्‍हणाले, याप्रकरणी गुजरातचे मुख्‍य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्‍याकडे मोदींच्या रोड शोचा अहवाल मागितला आहे. प्रथमदर्शनी पंतप्रधानांनी निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केले नसल्याचे गुजरातमधील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या ‘मोदीजी की वायु सेना’ या कथित टिप्पणीबाबत प्रश्न विचारला असता, या बाबत सविस्तर माहिती घेण्यात येणार असून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये ते स्पष्ट होईल, असे उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन तेंडुलकरचा पॉलिटीकल मास्टरक्लास

News Desk

अंतिम प्रचारसभेत मंचावर पंकजा मुंडे यांना भोवळ

News Desk

#MarathaReservation : आजपासून संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा कायदा लागू

News Desk