HW News Marathi
देश / विदेश

सातारा, कागल रस्ता रुंदीकरणासाठी तीन हजार कोटी

नवी दिल्ली | सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटी, तर ठाणे-भिवंडी या आठ पदरी बायपास रस्त्यासाठी एक हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली.एका महिन्यात निविदा व तीन महिन्यांच्या आत हे काम सुरू करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले आहेत. परिवहन भवन येथे गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते व परिवहनविषयक कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर गडकरी यांनी ही माहिती दिली.

बैठकीस महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, राज्यातील खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि केंद्रीय रस्तेवाहतूक विभागाचे सचिव युधवीरसिंह मलिक तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील रस्त्यांच्या ३० हजार कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्यत्वे सातारा-कागल (कोल्हापूर) हा चौपदरी रस्ता सहापदरी करण्यात येणार असून, या संदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात तांत्रिक बाबींमध्ये असलेली विसंगती दूर करण्यात आली. या रस्त्याच्या बांधकामासाठी तीन हजार कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. येत्या एक महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येतील आणि तीन महिन्यांत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तालीबानी थेट गोळ्या घालतील ,आई-वडिलांना भारतात आणण्यासाठी मोहम्मदची सरकारकडे याचना !

Jui Jadhav

“मोदींनी कधी शेतकऱ्यांची साधी विचारपूस केली का ? हा प्रजासत्ताक आहे का?”

News Desk

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेबाहेर अध्याय देण्याचा पहिला मान स्वारातीम विद्यापीठाला

News Desk