HW News Marathi
क्राइम

शाळकरी मुलींच्या ऑटोला अपघात, नऊ वर्षीची बालिका दगावली

वाशिम रिसोड-मालेगाव रस्त्यावर ऑटो रिक्षा व दुचाकी यांच्यात अपघात होवून नऊ वर्षीय विद्यार्थीनी मृत्यू झाला. अनुष्का गजानन देशमुख (९) असे या विद्यार्थ्यानीचे नाव आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता शाळेत जाताना ही घटना घडली. करडा येथील ऑटो (एमएचजी 3071) विध्यार्थ्यांना घेऊन रिसोडकडे जात असताना रिसोड-मालेगाव रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने धक्का मारल्याने ऑटो रिक्षा रस्त्याच्याकडेला उलटली. यात अनुष्का गजानन देशमुख ही बालिका ठार झाली. तर शीतल शिवाजी धांडे(15), प्रतीक सचिन तुरूंकमाने(7), अपेक्षा दगडू अंभोरे (१७), रिक्षाचालक विनोद मोरे जखमी झाले जखमींवर रिसोड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेल प्रशासनाकडून कायदेशीर कारण सांगत आर्यनच्या सुटकेस नकार

News Desk

भोकरमध्ये ६७ हजाराची अवैध देशी दारु  जप्त

News Desk

रेणापुर शिवारात गांजाने भरलेले पोते फेकून तस्कर फरार

News Desk