नवी दिल्ली | देशभरात गुरुवारी (१८ एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. या टप्प्यात देशभरातील १३ राज्यांमधील ९७ जागांसाठी तर महाराष्ट्रात एकूण १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, अनेक मतदारसंघांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या समस्येमुळे मतदात्यांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला. तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील मतदानाच्या टक्केवारीवर देखील परिणाम झाला.
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी ६१.७९ % मतदान मतदानाची नोंद झाली. इतर राज्यांच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, संध्याकाळी ६ नंतर देखील काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१२ राज्यांत महाराष्ट्र दहाव्या स्थानी
मणिपूर – ७७.८६ %
पुद्दुचेरी – ७७.४९ %
पश्चिम बंगाल – ७६.४२ %
आसाम – ७६.४२ %
छत्तीसगड – ७३.०५ %
तामिळनाडू – ७१.३२ %
कर्नाटक – ६८.१६ %
उत्तर प्रदेश – ६२.०६ %
बिहार – ६२.०४ %
महाराष्ट्र – ६१.७९ %
ओडिशा – ५८.७५ %
जम्मू-काश्मीर – ४५.६४ %
राज्यात दुसऱ्या टप्प्यात २० हजार ७१६ मतदान केंद्रांवर मतदान सुरु होते. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याच्या घडल्या त्यानंतर तात्काळ मतदान यंत्रे बदलून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुमारे ०.४ % मतदान यंत्रे तर ०.९ % व्हीव्हीपॅट बंद पडल्या होत्या त्या तात्काळ बदली करण्यात आली. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत खंड न पडल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे.
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी
बीड – ६४.५८ %
हिंगोली – ६३.३७ %
अमरावती – ६३.०८ %
नांदेड – ६२.९७ %
उस्मानाबाद – ६२.७५ %
परभणी – ६२.४७ %
लातूर – ६२.०२ %
अकोला – ५९.७६ %
सोलापूर – ५८.५७ %
बुलडाणा – ५७.९५ %
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.