HW News Marathi
राजकारण

भाजप नेत्याच्या ट्विटरवरून मोंदींवर सडकून टीका

नवी दिल्ली | भाजपचे माजी खासदार तरुण विजय यांच्या ट्विटर हँडल वरून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे समर्थन करणारी काही ट्विट्स केली गेली. नेटिझन्सकडून तरुण विजय यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. मात्र त्यानंतर त्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती देणारे ट्विट त्यांनी केले. यातील सर्वात पहिले ट्विट हे राहुल गांधी यांच्या मानस सरोवर यात्रेचे समर्थन करणारे होते.

पहिले ट्विट : राहुल गांधींच्या मानसरोवर यात्रेचे समर्थन

“राहुल गांधी यांच्यावर मानसरोवर यात्रेवरून केली जाणारी टीका आणि त्यांची खिल्ली उडवणे हे अत्यंत चुकीचे आहे. निदान हिंदूंनी तरी तसे करू नये. हा त्यांचा आणि त्यांच्या श्रद्धेचा मुद्दा आहे. शंकरपेक्षा मोठा कोणीही नाही. मला तीनवेळा कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याचे भाग्य लाभले आणि मी संघाच्या मानसरोवर यात्रेचे अध्यक्षपदही भूषविले होते.”

दुसरे ट्विट : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

तरुण विजय यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दुसरे ट्विट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे होते.

” तुम्ही खूप प्रसिद्ध आहात म्हणून तुम्ही त्या पदावर नाही तर तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळाला आहे म्हणून तुम्ही त्या पदावर आहात. त्यामुळे तुम्ही तुमचा अहंकार कमी करा.”

या सर्व ट्विट्सनंतर तरुण विजय यांनी आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते, अशी माहिती दिली. तसेच त्यांच्या सोशल मीडिया मॅनेजरची देखील हकालपट्टी केली गेली. सोशल मीडियावरून लोकांकडून झालेल्या टीकेमुळे त्यांनी ती सर्व ट्विट्स देखील आता डिलीट केली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

swarit

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk

एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी

Aprna