HW News Marathi
राजकारण

माझ्या नादी लागू नका, घरात घुसून ठोकून काढेन | सुप्रिया सुळे

मुंबई | लोकसभा निवडणूकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असताना देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे पाहावयास मिळत आहे. आता एका नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीमधून भाजपमधेय गेलेले राहुल शेवाळे यांच्यातील कथित संभाषण. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे म्हणत आहेत की, “माझ्या नादाला लागू नका. मी काही कंत्राटदार नाही. घरात घुसून ठोकून काढेन”. सुप्रिया सुळे यांनी अशी भाषा वापरल्याने सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील शेवाळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राहुल शेवाळे यांनी सुप्रिया सुळेंविरोधात काही विधाने केल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या. त्या बातम्यांची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांना फोन करून जाब विचारल्याचा दावा करणारी ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांच्यात झालेले कथित संभाषण

सुप्रिया सुळे : हॅलो मी सुप्रिया सुळे बोलते. राहुल शेवाळे मी तुम्हाला केव्हा अपमानित केले आहे ?

राहुल शेवाळे : असे काही नाही ताई, पेपरमध्ये चुकीचे स्टेटमेंट आले आहेत.

सुप्रिया सुळे : तुम्ही भाजपत गेला आहात ठीक आहे. पण माझ्या नादी लागू नका. मी खूप सिरियस आहे. मी काही काँट्रॅक्टर नाही. घरात घुसून ठोकून काढेन. माझ्या बदनामी विरोधात अब्रूनुकसानीचा दावा करेन. लक्षात ठेवा. मी काही काँट्रॅक्टर नाही. कुणाच्या बापाचे पाच पैसे खाल्ले नाही, एवढं लक्षात ठेवा.

सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांच्यात झालेल्या या कथित संभाषणाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर या खळबळजनक ऑडिओ बाबत सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. राहुल शेवाळे यांनी सुप्रिया सुळेंनी त्यांना धमकी दिल्याचा दावा केला असून ही बाब आपण मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढदिवसा निमित्त उद्धव ठाकरेंवर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव

News Desk

‘नमो’ टीव्हीच्या प्रसारणाविरोधात काँग्रेस-आपने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

News Desk

विधिमंडळातील राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी मला परवानगी द्या !

News Desk