HW News Marathi
राजकारण

जर तुमच्या पतीने एनडीएला मत दिले नाही तर त्यांना जेवायलाच देऊ नका !

नवी दिल्ली | “तुमच्या पतीने जर एनडीएला मत दिले नाही तर त्यांना जेवायला देऊ नका. उपाशी ठेवा”, असा अजब सल्ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांना दिला आहे. तुमच्या पतीला एनडीएला मत देण्यास सांगा. त्यांनी तसे न केल्यास त्यांना जेवायला देऊ नका. दिवसभर त्यांना उपाशी राहू देत”, असे नितीश कुमार यांनी महिलांना सांगितले आहे. नितीश कुमार मधुबनी येथील प्रचारसभेत महिलांशी बोलत होते.

“सध्या मोदी देशात आणि देशाबाहेर असंख्य आव्हानांचा सामना करत आहेत. इतक्या कठीण परिस्थितीत देखील त्यांनी जगभरात देशाची मान उंचावली आहे. जगातील अनेक देश त्यांचा सन्मान करत आहेत”, असे म्हणत नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक देखील केले. “सत्ता मिळवायची आणि बिहारच्या जनतेला लूटायचे हे महाआघाडीचे ध्येय आहे. महाआघाडीकडून जाती-धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे” आरोप देखील नितीश कुमार यांनी यावेळी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील सत्तांतरावर 8 ऑगस्टला होणार सुनावणी

Aprna

बांगलादेशमध्ये हसीना यांचा चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

News Desk

“झोपलेलं सरकार जागं होऊ दे…”; ‘मविआ’चे आमदार सरकारविरोधात आक्रमक

Aprna