HW News Marathi
राजकारण

काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला मतदान, सुशीलकुमार शिंदेंचाही आरोप

मुंबई | एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे सोलापूरमधील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी देखील अशाच प्रकारचा आरोप केला आहे. काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला मतदान होत असल्याची तक्रार सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कपबशीच्या चिन्हासमोरचे बटण दाबले तरीही कमळालाच मत जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी केला आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी देखील काँग्रेसच्या चिन्हासमोरचे बटण दाबल्यास भाजपलाच मतदान होत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ईव्हीएममधील बिघाडाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

“एकाही मतदाराची तक्रार नाही. उमेदवारांच्या तक्रारीत तथ्य नाही. चुकीची माहिती पसरवू नका. २७ ठिकाणी एव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड असला तरीही मशिन्स बदलली जात आहेत. कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही”, असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करणार !

News Desk

“पेडणेकरांनी मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी करत SRAमध्ये सदनिका मिळविली”, सोमय्यांचा आरोप

Aprna

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

News Desk