HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

मुंबई | विधान परिषदेसाठी काँग्रेसने दोन उमेवारांच्या नावे जाहीर केली आहे. काँग्रेसने विधान परिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. याआधी विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि नंदूरबारचा जिल्हा प्रमुख आमशा पडवी या दोघांची नावे जाहीर केली आहे. तसेच भाजपने विधानपरिषदेसाठी प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावाची चर्चा रंगली होती. परंतु, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावावर काँग्रेसच्या हाय कमांडने शिक्कामोर्तब केला आहे. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे किंवा रामराजे निंबाळकर या दोघांच्या नावत संभ्रम आहे.

भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडेंला डावलले 

भाजपकडून विधानपरिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, भाजपने विधानपरिषदेसाठी जाहीर केलेल्या यादी पंकजा मुंडेंचे नाव नसल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या हाती निराशा आली. पक्षाने पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांचे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.   विधानपरिषदेसाठी श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या दोन नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. यामुळे पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावलले.

 

संबंधित बातम्या

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना पुन्हा धक्का!; ईडी कोठडीत ३ दिवसांची वाढ

News Desk

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई वडिलांनी दिले स्पष्टीकरण

Manasi Devkar

शेअर मार्केटमध्ये आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ऐतिहासिक घसरण

swarit