HW News Marathi
देश / विदेश

संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा जोपासणार- व्यकंय्या नायडू

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) उपराष्ट्रपतीपदावर माझी निवड झाल्यास त्या पदाची प्रतिष्ठा आणि सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही व्यकंय्या नायडू यांनी मंगळवारी दिली. उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. नियतीच्या डोक्यात वेगळाच विचार असल्याने आपल्याला या पदासाठी उमेदवारी मिळाली आहे. पुढे काय लिहून ठेवले आहे, हे येता काळच सांगेल असेही व्यकंय्या नायडू यांनी म्हटले आहे. आपण संसदीय लोकशाहीचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले आहे. नायडू यांनी मंगळवारी उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष अमित शहा, मुरली मनोहर जोशी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वोडाफोन, एअरटेल आता तुमचे सिम बंद करणार ?

News Desk

आलोक वर्मांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करावी !

News Desk

बाळासाहेबांचाच वारसा आहे सिद्ध करा, नाहीतर मुख्यमंत्रीपद खुर्ची सोडा !, मेटे आक्रमक

News Desk