HW News Marathi
देश / विदेश

मालेगावमध्ये आणखी नवे ५ ‘कोरोना’रुग्ण, मर्कजशी संबंध असल्याची शक्यता

मुंबई | राज्यात सध्या ‘कोरोना’चा विळखा वाढत चालला आहे. तासागणिक कोरोनाबाधितांचा हा आकडा वाढतच जात असल्याने आता राज्य सरकारची चिंता वाढली आहे. त्यातच आता मालेगावमध्येही कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी (९ एप्रिल) रात्री मालेगावमध्ये ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. या ५ जणांपैकी एक जण दिल्लीहून आल्याने मर्कज प्रकरणाशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मालेगावमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९ वर पोहोचला असून त्यापैकी एकाच मृत्यू झालेला आहे. मालेगावमध्ये या नव्याने सापडलेल्या ५ कोरोना रुग्णांपैकी ४ पुरुष तर १ महिलेचा समावेश आहे.

मालेगावमध्ये सापडलेल्या या ५ रुग्णांपैकी १ जण चांदवड येथील २६ वर्षीय तरुण आहे. तर यात मालेगाव पूर्व भागातील ६२ वर्षीय महिलेचा आणि नयापुरा भागातील ५८ व ६१ वर्षांच्या दोन रुग्णांचा देखील समावेश आहे. तर एक जण मोमीनपुरा भागातील ३७ वर्षीय दुकानदार आहे. धक्कादायक यातील ४ जणांनी कोणत्याही प्रवास केला नसून मोमीनपुरा भागातील हा रुग्ण मात्र दिल्लीहून आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा आता मर्कज प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..

मालेगावमध्ये वाढत जाणाऱ्या या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे आता भीती व्यक्त केली जात आहे. खरंच याचा दिल्लीतील मर्कज प्रकरणाशी संबंध आढळून आल्यास मालेगाव कोरोनाचे केंद्र बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे. म्हणूनच सध्या या कोरोनारुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याचे काम सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीर अन् लडाख मध्यरात्रीपासून केंद्रशासित प्रदेश

News Desk

पोलिसच पुरवतात दहशतवाद्यांना शस्र

News Desk

कोण आहे स्टीफन हॉकिंग

News Desk