मुंबई | धारावीतील पीएमजीपी कॉलनीमधील निर्माणाधीन इमारतीचा काही भाग कोसळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आहे. ही घटना रविवारी (१४ एप्रिल) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला.
Spot visuals: 1 dead & 3 injured after a portion of an under-construction building collapsed in Dharavi's PMGP colony in Mumbai. Injured have been shifted to hospital. #Maharashtra pic.twitter.com/x8Ci7Yh1Re
— ANI (@ANI) April 14, 2019
कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरून जाणारी एक व्यक्तीही या अपघातात जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन बचावकार्य केले. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.