HW News Marathi
क्राइम

चालत्या बसमधील सेक्स व्हिडीओ, भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा

चंद्रपूर धावत्या बसमध्ये अश्लिल चाळे करणाºया भाजप नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र बावनथडे असे त्याचे नाव असून, तो भाजपचा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस आणि माजी महासचिव आहे.

धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रवींद्र बावनथडे हा चालत्या बसमध्ये एका तरुणीशी लैंगिक चाळे करताना दिसत आहे. बावनथडेने नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप, संबंधित तरुणीने केला आहे. त्यानंतर चंद्रपुरातील नागभिड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बावनथडे आणि एक तरुणी २७ जूनला नागपूरवरुन नागभिडकडे जाणाºया ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. या बसमध्येच त्याने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते. ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. धक्कादायक म्हणजे या बसमध्ये अनेक प्रवासी असूनही, बावनथडे शारीरिक संबंध करत असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणीने पोलिस स्टेशन गाठून तीने बलात्काराचा खटला दाखल केला. बावनथडेने नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप तीने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी रवींद्र बावनथडे सध्या फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

वयाची पन्नाशी गाठलेला रवींद्र बावनथडे हा भारतीय जनता पक्षाचा जुना कार्यकर्ता असून, सध्या भाजपचा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणूनही तो कार्यरत आहे. बावनथडे हा आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील कर्मवीर विद्यालयात शिक्षक होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकाच वेळी तीन अंडरवेअर, सात शर्ट-पँट घालून तो लाखोंना गंडवायचा

News Desk

उल्हासनगर महापालिका आयुक्तांसह डीसीपी, एसीपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार

News Desk

नगरच्या दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्कच्या अधीक्षक जाधव निलंबित

News Desk