HW News Marathi
क्राइम

भावना गवळींचा ईडी चौकशीला नकार; हे आहे कारण

मुंबई | किरीट सोमय्यांच्या आरोपनंतर आता अनेक नेते मंडळी विशेत: महाविकासआघाडीची नेते मंडळी ईडीच्या कचाट्यात सापडलेली आपण पाहतोय. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे 15 दिवसांची मुदत मागितली असून आज त्या ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे. भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत.

गवळी यांच्या एका संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली

पुढील 15 दिवस गैरहजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितला असल्याचंही इंद्रपाल सिंग यांनी सांगितलं. भावना गवळी यांच्याकडून ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचं पत्रं देण्यात येणार असून मेडिकल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे. खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या एका संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती.

मागील दोन महिन्यात परब यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. मात्र, गणेशोत्सव असल्यानं त्यांनी वेळ मागून घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आलं. त्यानुसार, आज ते ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. दुसरीकडे भावना गवळींचं प्रकरण असं आहे की,श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.आता चिकनगुनियामुळे सध्या त्या ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार नाही आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगर दारूकांडातील बळींची संख्या सात वर

News Desk

CGST ठाणे आयुक्तालयाकडून 8 कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड

News Desk

‘माझी वर्दी राष्ट्रपतींनी दिलेली, ती उतरवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना शुभेच्छा’- समीर वानखेडे

News Desk