HW News Marathi
महाराष्ट्र

.तर २०१९ मध्ये भाजप सत्तेतून हद्दपार

नवी दिल्ली- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव आणि मायावती एकत्र येण्याची शक्यता आहे. असे घडल्यास भाजप सत्तेतून हद्दपार होईल, असा इशारा लालू प्रसाद यादव यांनी दिला. बुधवारी राष्ट्रीय जनता दलाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त लालूप्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. प्रियंका गांधी, रॉबर्ट वडेरा, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी असो किंवा लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय असो, केंद्र सरकारकडून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीबाबत यादव म्हणाले, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाचे मायावती हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. हे दोघे एकत्र आल्यास भाजप सत्तेतून हद्दपार होईल, असा इशारा त्यांनी दिला.

केंद्र सरकारविरोधात विरोधक एकत्र आले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत याची सुरुवात झाली. काँग्रेससह १७ पक्षांची एकजूट झाली आहे. तर नितीशकुमार यांच्या जनता दल संयुक्तने काँग्रेसशी फारकत घेत भाजपशी जवळीक साधली आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणण्याचे लालूप्रसाद यादव यांचे प्रयत्न यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र येतील, अशी चिन्हे होती. खुद्द अखिलेश यादव यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात

swarit

चित्रा वाघ यांचा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश; ८० जणांच्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश!

News Desk

राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावं, अब्दुल सत्तार यांची ऑफर

News Desk
क्रीडा

सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू नरसिंग यादवने घेतली आठवलेंची भेट

News Desk

नवी दिल्ली | कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक विजेता ठरलेला भारताचा कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या नवी दिल्लीतील शास्त्रीभवन येथील दालनात भेट घेतली.

सुवर्णपदक विजेता कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांच्यावर अन्नचाचणीत दोषी आढळल्याने 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी सुरू आहे. ही चौकशी लवकर पूर्ण झाल्यास आपण निर्दोष सिद्ध होऊ असे मनोगत नरसिंग यादव यांनी यावेळी रामदास आठवलेंकडे व्यक्त केले.

तसेच कुस्तीपट्टू नरसिंग यादव हे सध्या मुंबई पोलिसात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांना मिळणारा पगार अपुरा असल्याची खंत त्यांनी रामदास आठवलेंकडे व्यक्त केली. याप्रकरणी कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य तो प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवलेंनी यांनी दिले.

 

Related posts

राज्य शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत १००० स्पर्धक सहभागी होणार

Gauri Tilekar

डॉ. रवींद्रकुमार सिंघल ठरले ‘आयर्नमॅन २०१८’

Gauri Tilekar

आयसीसीकडून तीन खेळाडूंवरील मॅच फिक्सिंगचे आरोप निश्चित

News Desk