HW News Marathi
महाराष्ट्र

शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार जाहिर

उत्तम बाबळे

नांदेड :- डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार सुधीर गाडगीळ, अशोक वानखेडे यांच्यासह अन्य मान्यवरांना जाहीर झाला असून दि.१४ जुलै २०१७ शुक्रवार, सायंकाळी ६:०० वा. कुसूम सभागृह, नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने भारताचे माजी गृहमंत्री तथा मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यातीलच नव्हे तर देशातील मान्यवर व्यक्तीमत्वांचा डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे हे नववे वर्ष आहे. यावर्षी ज्येष्ठ निवेदक तथा सुत्रसंचालक सुधीर गाडगीळ, दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, गरीबांच्या मोफत शस्त्रक्रिया करणारे पुणे येथील डॉ.श्रीरंग लिमये, चळवळीत सदैव अग्रेसर असणार्‍या सौ.सुषमा अंधारे, शिरपुर पॅटर्नचे जनक सुरेश खानापुरकर, रयतच्या माध्यमातून रूग्णांची सेवा करणारे डॉ.सुरेश खुरसाळे, चला हवा येऊ द्यामध्ये पत्र लेखन करणारे अरविंद जगताप, राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त आयबीएन लोकमतच्या हलीमा शेख, हेल्थ केअर तज्ञ म्हणून अनेक पुरस्कार मिळणारे अमेरिकेचे सचिन देशपांडे, सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर लातुरचे विजयकुमार यादव व शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे पुणे येथील भीमशाहीर प्रमोद लोखंडे यांना सदरील पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह गु्रपचे रामेश्वर धुमाळ, दिलीप माहोरे, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे बालाजी पवार, श्रीमती पुनीता रावत, सौ.संगीताताई बारडकर, शिवहरी गाढे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश पांडे तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : तामिळनाडूत पहिला बळी, तर देशात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू

swarit

चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कालबद्धरित्या सोडवावे! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे सत्तेचा गैरवापर करून सरकारं दुबळी करणं

News Desk