HW News Marathi
Uncategorized

‘तो’ पुन्हा येतोय कपिल शर्मा शोमध्ये

मुंबई – हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय झालेल्या कपिल शर्मा शोमधील कलावंतांमध्ये गेल्या मार्च महिन्यात आपसात वाद झाला होता. त्यानंतर काही कलाकारांनी कपिलसोबत शो करणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि ते बाहेर पडले. मात्र, याच शोमध्ये कपिलसोबत असलेला त्याचा मित्र पुन्हा शोमध्ये परत येतोय.

मार्च महिन्यात कपिल शर्मानं मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) हून परतत असतांना विमानातील प्रवासादरम्यान आपला सहकलाकार सुनील ग्रोव्हरला शिवीगाळ आणि मारहाण केली होती. इतर सहकारी कलाकारांनाही कपिलनं शिवीगाळ केल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली त्यावर भरपूर चर्चाही झाली. त्यानंतर सुनील ग्रोव्हरसह काही कलाकार या शोपासून दूर झाले आहेत.

मात्र, मित्राला (कपिल) आपली गरज असल्यानं शोमध्ये पुन्हा परतण्याचा निर्णय घेतल्याचं चंदन प्रभाकरनं स्पष्ट केलं. तीन महिन्यानंतर चंदन या शोमध्ये परत येतोय. आमच्यातील सर्व वाद आता मिटले आहेत, त्यामुळं कपिलला माझी गरज असल्यानं मी शोमध्ये परत येण्याचा निर्णय घेतल्याचं चंदननं सांगितलं.

कपिल आणि मी लहानपणीपासून मित्र आहोत, काही दिवसांपुर्वी आम्ही भांडतही होतो. आता आम्ही टिव्ही चॅनेलवर शो करत आहोत, प्रसिद्धही झालो आहोत त्यामुळं आता आम्ही भांडणं बंद केली आहेत. आमच्या वैयक्तिक आयुष्यात आम्ही आमच्या मुलांसोबत भांडतो तेवढं पुरेसं असल्याचं चंदनचं म्हणणं आहे. सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन यांनी शो सोडल्यामुळं टिआरपीवर त्याचा परिणाम झाला होता, आणि या शोचा टिआरपी घसरला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून नौदलाचे अभिनंदन

swarit

पदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ ; करणी सेनेची धमकी

News Desk

गांधींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांचा विजय ही देशासाठी चिंतेची बाब !

News Desk