HW News Marathi
देश / विदेश

पेडन्यूजबाबत खोटी माहिती देणारे मंत्री मिश्रा तीन वर्षांसाठी अपात्र

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगानं मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांना तीन वर्षांसाठी अपात्र केलंय. मिश्रा यांनी निवडणूक लढवतांना आयोगाला सादर केलेल्या खर्चाच्या विवरणामध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी आयोगानं ही कारवाई केल्याची माहिती आयोगाच्या प्रवक्त्यांनी दिलीय. मिश्रा हे दातिया विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या कारवाईमुळं मिश्रा यांना २०१८ साली होणाऱी विधानसभा निवडणूक लढवता येणार नाही.

काँग्रेसचे नेते राजेंद्र भारती यांनी मिश्रा यांच्या विरोधात तक्रार केली होती. मुख्यमंत्री शिवराज सिहं चौहान यांचे मिश्रा हे निकटवर्तीय समजले जातात. मिश्रा यांनी २००८ मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चाच्या विवरणपत्रामध्ये अपेक्षित माहिती भरलेली नाही. त्याप्रकरणी १५ जानेवारी २०१३ मध्ये निवडणूक आयोगानं मिश्रा यांना नोटीस बजावली होती. आयोगाच्या नोटीसीविरोधात मिश्रा यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, या दोन्ही ठिकाणी त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळं अखेर निवडणूक आय़ोगानं मिश्रा यांना तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षणसंस्थांमध्ये १० टक्के आरक्षण

News Desk

HW Exclusive: कोरेगाव-भीमाची दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत होती | बी. जी कोळसे-पाटील

swarit

“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असतात?”, मुख्यमंत्र्यांचा सवाल

News Desk