HW News Marathi
मुंबई

होय, मी अधिकाऱ्याला झापलं – महापौर महाडेश्वर

  • महापौर – अधिकारी मोबाईल संभाषण व्हायरल
  • २० दिवसांआधीची ऑडिओ क्लिप असल्याचा अंदाज
  • कॉल रेकॉर्ड करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मुंबई – मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. त्यामुळं एकच खळबळ उडालीय. नियमानुसार परवाने रद्द करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला महपौर महाडेश्वर जाब विचारताना तुम्ही परवाने रद्द केले आता तुम्हांला निलंबित करतो, अशी धमकी देतांना ऐकायला मिळते.

जितेंद्र नावाच्या पालिका कर्मचाऱ्याला नोटीस बजावल्याप्रकरणी जाब विचारला. कर्मचाऱ्यानं वरिष्ठांच्या आदेशाचं पालन केल्याचं सांगितलं. तसंच अटी शर्तींचं पालन न केल्यामुळे नोटीस पाठवल्याचं कर्मचाऱ्यानं सांगितलं. यावर तुम्ही तरी कुठे पालन करता, आता तुला पण कामावरुन कमी केलं पाहिजे असं महाडेश्वर कर्मचाऱ्याला बोलताना रेकॉर्ड झालं आहे. यानंतर कर्मचाऱ्यानं वरिष्ठांशी बोलण्याची विनंती महापौरांना केली.

महापौरांना याप्रकरणी विचारलं असता, या ऑडिओ क्लिपमधील आवाज आपलाच असल्याचं मान्य केलं. तसंच इतके दिवस या अधिकाऱ्यानं आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आपण त्याला झापल्याचं स्पष्ट केलं आहे. महापौरांकडे लोकं तक्रारी घेऊन येतात, त्याविषयी अधिकाऱ्यांना विचारणा करावी लागते, त्याअनुषंगानचं त्या अधिकाऱ्याला आपल्या दालनात बोलावल्याचा खुलासाही महापौर महाडेश्वर यांनी केलाय.

मनसेचे महापालिकेतील तत्कालीन गटनेते संदीप देशपांडे यांनीही २०१५ मध्ये तत्कालीन महापौर स्नेहल अंबेकर यांचा कॉल रेकॉर्ड केला होता. त्यानंतर कॉल रेकॉर्ड करून महापालिकेच्या निधीवाटपाची चर्चा सार्वजनिक केल्याप्रकरणी आणि मुंबईच्या महापौरपदाचा घोर अवमान केल्याप्रकरणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी आझाद मैदान पोलिसात देशपांडेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होतीत. त्यामुळं महपौर महाडेश्वर – अधिकारी प्रकरणातही असाच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर दरम्यान रेल्वे रुळाला तडे

Gauri Tilekar

समलैंगिकता गुन्हा नाही, न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत

News Desk

राष्ट्रवादीचा गड असलेला पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व

News Desk