HW News Marathi
क्राइम

बिलोलीत अवैध दारू दुकानावर छापा , 29 जणांवर कारवाई

उत्तम बाबळे

नांदेड :- अवैध धंद्या विरुद्ध कारवाई करण्याबाबदचे सक्त आदेश असतांनाही या आदेशाची पायमल्ली करुन अवैध धंदे व्यावसायीकांना ते धंदे करण्याची संमत्ती देणा-या स्थानिक पोलीसांचे पितळ उघडे पडले. २० जून रोजी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने बिलोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २ जुगार अड्डे,घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करणारे हाॅटेल व अवैध दारु विक्री करणा-यावर अशा वेगवेगळ्या चार ठिकाणी मारलेल्या छाप्यात २९ जणांसह रोख रक्कम,जुगार साहित्य,१० मोबाईल,२ मोटार सायकली,घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व २ बाॅक्स देशी दारु असा एकूण १ लाख ६२ हजार ४७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात जुगार अड्डे चालत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरुन विशेष पोलीस पथक प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकातं चिंचोलकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर, जगताप,वानखेडे,कुलकर्णी,पायनापल्ले, निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते यांनी २० जून २०१७ रोजी दुपारी २:२० वाजताच्या दरम्यान माै.भोसी ता.बिलोली येथे मारोती शिकारे यांच्या मोकळ्या प्लाॅट वरील पत्र्याच्या शेड खाली व झाडाखाली झन्ना मन्ना नावाचा पत्ते जुगार खेळविणा-या अड्ड्यावर छापा मारला.या कारवाईत जुगार खेळविणा-या व खेळणा-या १७ जणांसह काही रोख रक्कम,१० मोबाईल,२ मोटार सायकली व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ३९ हजार १५० रुपयाचा मुद्देमाल मिळाला.तर काही वेळाने बिलोली शहरातील एका जुगार अड्ड्यावर दुसरा छापा मारला असता तेथे ८ जण जुगार खेळतांना सापडले.यात काही रोख रक्कम,५ मोबाईल,जुगार साहित्य असा १७ हजार २२० रुपयाचा मुद्देमाल मिळाला. घरगुती गॅसचा हाॅटेल व्यवसायासाठी बेकायदेशीरपणे वापर केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन बिलोली शहरातील हाॅटेल मराठवाडा येथे तिसरा छापा मारला असतांना तेथे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतांना अ.मतीन अ.बशीर (५७) रा.बिलोली व अर्जुन गंगाधर पवार ,रा.अर्धापुर जि.नांदेड हे आणि १० हजार रुपये किमतीचे इंडियन गॅसचे २ गॅस सिलेंडर मिळाले.तसेच अवैध देशी दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन बिलोली शहरातील एका अवैध दारु विक्रेत्याच्या घरी चाैथा छापा मारला असता यात २ जण अवैध विक्रीसाठी देशी दारुचे बाक्स नेतांना मिळाले. त्या दोघांसह ५,५०० रुपये किमतीची २ बाॅक्स भिंगरी देशी दारु जप्त करण्यात आली. एकंदरीत मारलेल्या वेगवेगळ्या चार छाप्यातील २९ जणांच्या अटकेसह १ लाख ६२ हजार ४७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्या २९ जणाविरुद्ध त्या त्या गुन्ह्यातील उपरोक्त सहभागीच्या संखेनूसार मुंबई जुगार कायदा,जिवनावश्यक अन्न व वस्तू अधिनियम कायदा आणि मुंबई प्रोव्हीशन कायद्या प्रमाणे बिलोली पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपहरण झाल्याचा बनाव, स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे उघड

swarit

सीबीआयकडून युक्तीवाला सुरूवात

News Desk

जास्मिन वानखेडेंवर आरोप केल्याने मनसे आक्रमक

News Desk