HW News Marathi
मुंबई

युटर्न म्हणजे उद्धव ठाकरे – नितेश राणेंची टीका

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून जोरदार टीका करत आहेत. त्यात आता आणखी एक भर पडलीय ती नव्या ट्वीटची.

गुगल मॅपनं युटर्न या शब्दासाठी आता नवा शब्द तयार केलाय. आता युटर्न म्हणजे उद्धव ठाकरे. त्यामुळं पुढच्यावेळी तुम्ही युटी असं टाईप केलं तर त्याचा अर्थ उद्धव ठाकरे असा निघेल, अशी उपहासात्मक पोस्ट आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवर केलीय. काही दिवसांपूर्वी नितेश यांनी ट्वीटरवर एक पत्र पोस्ट केलं होतं. त्यात पोकळ धमक्यांसाठी उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकमध्ये नोंद करण्याची मागणी करणारं पत्रच नितेश राणेंनी ट्वीटरवर पोस्ट केलं होतं. राणे – ठाकरे परिवारात आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. मात्र, नितेश राणेंनी गेल्या काही दिवसात ट्वीटरच्या माध्यमातून केलेल्या टीकांना अद्याप ठाकरे परिवाराकडून कुठलचं प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ओव्हरफ्लो

News Desk

उत्सवाच्या काळात ‘परे’ची कारवाई

News Desk

आधुनिक यंत्र युगातही वाचन संस्कृती लोप पावणार नाही …

News Desk