HW News Marathi
महाराष्ट्र

ठाण्यात पेट्रोल पंप चालकाकडूनच पेट्रोलची चोरी

ठाणे पोलिसांनी उघडकीस आणली चोरी

ठाणे – ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंप चालकाची हायटेक पेट्रोल चोरी पोलिसांनी उघडकीस आणलीय. वाहनचालकांना पेट्रोल भरतांना दिलेल्या पैशापेक्षा कमी पेट्रोल दिले जात होते, मात्र पेट्रोलच्या मशीनवरचा आकडा हा ग्राहकांना अपेक्षित असाच होता. जेव्हा पोलिसांनी या पंपावरील मशीन तज्ज्ञांच्या सहायानं तपासली तेव्हा हा पेट्रोल चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पेट्रोल पंपावर जर समजा तुम्ही दोन लिटर पेट्रोल भरले असेल तर तुम्हांल मशीनवर दोन लिटर पेट्रोल भरल्याचं दिसायच. पण प्रत्यक्षात तुमच्या गाडीमध्ये फक्त दीड लिटरच पेट्रोल गेलेलं असायचा. याप्रकाराच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या, त्यावर ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकनं आज पेट्रोल पंपावरील मशीनची तज्ज्ञांच्या सहायानं तपासणी केली. त्यामध्ये पेट्रोल पंपाच्या मालकानं मशीनमध्ये एक चीप टाकली होती, त्यामुळं प्रत्यक्षात भरण्यात आलेलं पेट्रोल आणि मशीनमध्ये दिसत असलेला आकडा यामध्ये तफावत असायची. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पंपं चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पेट्रोल पंपाला सील केलंयं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आली आहे”, हसन मुश्रीफ कडाडले

News Desk

भारतीय नौसेनेत कोरोनाचा शिरकाव, २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

एखाद्या वाक्याने व्यक्ती वाईट होत नाही !

swarit