मुंबई जेट एअरवेजच्या विमानात एक महिलाने बाळाला जन्म दिला आहे. त्या बाळाला आयुष्यभर जेट एअरवेज कंपनीकडून मोपत विमान सेवा देण्यात येणार आहे. अशी माहिती जेटएअरवेजकडून देण्यात आली आहे.सौदी अरबस्तानील 9 w जेट एअरवेजचं 9W 569 विमान 2 वाजून 55 मिनिटांनी दम्माम येथून कोचीकडे जात होतं. या प्रवासा दरम्यान एक महिलेने बाळाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहे.
जेट एअरवेज कोचीकडे निघाल्यानंतर विमानात उपस्थित महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्या. यानंतर वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानात एकूण 162 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी केबिन क्रू ने विमानात कोणी डॉक्टर असल्यास मदतीकरता पुढे येण्याची विनंती केली. प्रवाशांमध्ये कोणीही डॉक्टर नव्हता, मात्र सुटीत केरळला घरी परत निघालेली एक परिचारिका होती. तिच्या मदतीने विमान कर्मचाऱ्यांनी या महिलेची प्रसूती सुखरूपपणे पार पाडली. मुंबई विमानतळावर विमान उतरवण्यात आलं मुंबईत विमानाचं लँडिंग झाल्यानंतर महिला आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांचीही तब्बेत व्यवस्थित असून सुखरुप असल्याची माहिती जेट एअरवेजने दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.