HW News Marathi
देश / विदेश

जिथं रोखलं होतं, तिथंच कोविंद सन्मानानं जाणार ?

शिमला – बिहारचे राज्यपाल आणि भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना काही दिवसांपुर्वी शिमला येथील रिट्रीट इमारतीत जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. विशेष म्हणजे ही इमारत राष्ट्रपती भवनचाच एक भाग आहे. कुटुंबासोबत गेल्या महिन्यात कोविंद हे या ठिकाणी सहलीसाठी गेले होते, त्यावेळी ही घटना घडली होती. कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. योगायोगानं त्यानंतर कोविंद यांचंच नाव राष्ट्रपती पदासाठी पुढं आल्यानं आता १७ जुलैनंतर ते सन्मानानं याच इमारतीत जाण्याची शक्यता आहे.

अत्यंत साध्या राहणीमानासाठी कोविंद कुटुंबिय ओळखले जातात. गेल्या महिन्यात शिमला इथं कुटुंबियांसह सहलीवर गेल्यानंतंर कोविंद कुटुंबिय हे तिथं भाड्याच्या टॅक्सीनं फिरले होते. शिमल्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर प्रेसिडेन्शियल समर रिट्रिट नावाचा परिसर आहे, त्या ठिकाणच्या रिट्रिट इमारतीत जाण्यापासून कोविंद कुटुंबियांना रोखण्यात आलं होतं.

७१ वर्षीय कोविंद हे गेल्या २८ मे रोजी शिमल्याला सहलीसाठी आले होते. त्यावेळी कडेकोट सुरक्षा असलेल्या माशोब्रा हिल्स परिसरातील रिट्रीट इथं गेले होते, त्यावेळी त्यांना आवश्यक त्या परवानग्या न घेतल्यानं प्रवेश नाकारण्यात आला होता. रिट्रीट हा राष्ट्रपती भवनाचाच एक भाग आहे. स्वातंत्र्यानंतर त्यालाच राष्ट्रपती भवन बनवण्यात आलं होतं. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ अँडव्हान्स स्टडी (आयआय़एएस) या संस्थेला ही इमारत हस्तांतरीत करण्यात आलीय. राष्ट्रपती हे वर्षातून एकदा या ठिकाणाला भेट देत असल्याची परंपरा आहे. त्याकालावधीत त्यांचं कार्यालयही याठिकाणी स्थलांतरित करण्यात येतं.

हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांचे सल्लागार शशिकांत याविषयी बोलतांना म्हणाले की, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे कुटुंबियांसह शिमलाच्या सहलीवर आले होते, त्यावेळी ते कल्याणी इथल्या हेलिपॅडवर उतरले. ते हेलिपॅड हे फक्त राष्ट्रपतींच्या विमान अथवा हेलिकॉप्टरच्या लॅंडिंगसाठीच आहे. मी त्यांना फिरण्यासाठी शिमल्यातील विविध प्रेक्षणीय स्थळं सूचवली होती. कोविंद यांना हिरवळीची आवड असल्याचं शशिकांत यांनी सांगितलं. कोविंद यांना साधं राहणीमान आवडतं. कोविंद आणि त्यांच्या पत्नीनं शासकीय वाहनाचा तर कुटुंबातील इतर सदस्यांनी भाड्याच्या टॅक्सीनं प्रवास केल्याचं शशिकांत यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या मदतीला विठुराया धावून आला

swarit

येत्या १५ दिवसांत ठाकरे सरकारच्या आणखी २ मंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ येणार !

News Desk

जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट, १ जवान शहीद तर ७ जण जखमी

News Desk