HW News Marathi
देश / विदेश

केरळच्या मदतीला विठुराया धावून आला

पंढरपूर | मुसळधार पावसामुळे केरळमध्ये हाहाकार माजला आहे. या पावसामुळे केरळमधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील पूरग्रस्तान मदत करण्यासाठी विठुराया धावून आला आहे. केरळच्या पूरग्रस्तांना संपूर्ण देशातून मदत केली जात आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहय्यता निधीस २५ लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी मदतीची घोषणा केली आहे. मंदिर समितीने दोन वर्षापुर्वी महाराष्ट्रातील दुष्काळासाठीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराने एक कोटीची मदत केली होती. तसेच महाराष्ट्रातील विविध सामाजिक, स्वयंसेवी आणि व्यावसायिक संस्थांनी पुरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे.

देशातील मोठे उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. रिलायन्सने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ कोटी रुपयांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर रिलायन्स फाऊंडेशन तब्बल ५१कोटी रुपयांचे आवश्यक साहित्य पाठवणार आहे.

Related posts

हाथरस प्रकरणी CBIने दाखल केला ‘हत्येचा गुन्हा’, तपास सुरु

News Desk

काँग्रेसने महाराष्ट्र सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा, आठवलेंचा सल्ला

News Desk

#26/11Attack : २६/११ च्या कटू आठवणी, असा झाला होता दहशतवाही हल्ला…

News Desk