HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून अमित शहांचं वजन झालं कमी

नवी दिल्ली – देशाच्या राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्त्व असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचं सध्या वजन कमी झालंय. त्यांचं परिचित असलेले योगगुरू बाबा रामदेव यांनीच हा खुलासा केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर देशातलं सगळ्यात वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून अमित शहांकडे पाहिलं जातं. आणि प्रत्येक निवडणुकीगणिक शहांचं राजकीय वजन वाढत चाललंय. एकीकडे सार्वजनिक आयुष्यातील वजन वाढत असतांनान अमित शहा यांचं शारीरिक वजन मात्र, कमालीचं कमी झाल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केलाय. नियमित योगासनं केल्यानं शहा यांचं वजन कमी झाल्याचं बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलंय.

ऑलिम्पिकमध्ये योगाचा समावेश करा – बाबा रामदेव

२१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांनी आज अहमदाबाद येथे योग शिबीर घेतले. या शिबीरानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘योग हा खेळ नाही असं म्हणणारे अज्ञानी आहेत. त्यांचं मताला फार किंमत देण्याची गरज नाही. योग हा खेळाचाही एक प्रकार आहे. त्यामुळं योगाला क्रीडा प्रकारात स्थान मिळालं पाहिजे. तसंच, ऑलिम्पिकमध्ये योगाचा समावेश व्हावा यासाठीही प्रयत्न केला पाहिजे,’ अशी मागणी रामदेव यांनी यावेळी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालखीच्या प्रवासासाठी आकारण्यात आलेले शुल्क तात्काळ परत करण्याचे आणि चौकशीचे आदेश – अनिल परब

News Desk

“तुमचा पराभव बगलबच्च्यांच्या उद्योगांमुळे झाला”, शिवेंद्रराजेंची शशिकांत शिंदेंवर जहरी टीका!

News Desk

महाराष्ट्र, मुंबई विरोधात बोलणाऱ्या लोकांची पुढची पावले राजकारणाचीच!

News Desk