HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांला दिलासा! मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्याला माध्यमांसमोर बलण्यास बंदी घातली असून अटी शर्तींसह राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यांना ५० हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राजद्रोह गुन्हा अंतर्गत त्यांना अटक केले होते. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर २ मो रोजी निकाल लिहून पूर्ण न झाल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने आज (४ मे) निकाल राखून ठेवला होता. सध्या रवी राणा यांच्या १७ तर नवनीत राणा यांच्या ७ गुन्हे दाखल झाले आहे. सध्या नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणा तळोजा कारागृहात ठेवले आहे.

 नवनीत राणा यांना स्पाँडिलायसिसचा आजार असून त्या सध्या भायखळा तुरुंगात जमिनीवर झोपावले लागते. यामुळे नवनीत राणांचा स्पाँडिलायसिसचा त्रास बळावला आहे. नवनीत राणांनी त्यांना होणाऱ्या आजाराबदल तुरंग अधीक्षकांना सांगितले. नवनीत राणांनी प्रकृती खालावल्यानंतर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसा त्यांना नाट्यानंतर पोलिसांनी २३ एप्रिल अटक केले होते. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने २४ एप्रिल रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी २३ एप्रिलला रोजी हनुमान चालिसा पठाण करण्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यानी अमरावती पोलिसांनी हुलकावणी देऊन एक दिवस आधी मुंबई दाखल झाले होते. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मातोश्री समोर ठिय्या आंदोलन केले. तर काही शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार मधील घरासमोर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आणि राणा दाम्पत्याना त्यांच्या घरात थांबविले. दरम्यान, राणा दाम्पत्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौ-याचे पाश्वभूमीवर कारण सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानी जावून हनुमान चालिसा पठाण करण्याचा निर्णय मागे घेतला व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला. यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याना राजद्रोहाच्या गुन्हा अंतर्गत अटक केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१८ फेब्रुवारीपर्यंत एसटी विलीनीकरणाचा अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Manasi Devkar

पूरग्रस्त मुलीच्या लग्नाचा खर्च दीपाली सय्यद उचलणार!

News Desk

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता- उद्धव ठाकरे

News Desk