HW News Marathi
देश / विदेश

रामनाथ कोविंद येत्या २३ जूनला उमेदवारी अर्ज दाखल करणार ?

– एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद २३ जूनला अर्ज दाखल करण्याची शक्यता

नवी दिल्ली – भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे येत्या २३ जूनला आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. २३ जूनला सकाळी अकरा वाजता ते लोकसभा सचिवांच्या दालनात अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिलाय. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोविंद यांचा राजीनामा स्विकारला आहे, अशी माहिती राष्ट्रपती भवनकडून प्रसिद्धीपत्रकादवारे देण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आलाय.

काल भाजपनं एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून ७१ वर्षीय रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली होती. येत्या १७ जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणुक होतेय. विद्यमान राष्ट्रपती मुखर्जी यांचा पाच वर्षांचा कालावधी येत्या २४ जुलैला संपतोय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आयआयटी जेईई परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

News Desk

नोटबंदीतून किती काळा पैसा आला याची माहीती नाही, आरबीआयचा संसदीय समितीला अहवाल सादर

News Desk

बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील एकूण ५१ शाखा बंद होणार

swarit
क्राइम

साप चावल्यानं तरूणीचा मृत्यू

News Desk

उत्तम बाबळे

नांदेड :- जिल्ह्यातील माै.सावरगाव (मेट) ता.भोकर येथील एका २७ वर्षीय तरुणीचा झोपेत असतांना विषारी सर्पदंश झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून भोकर पोलीसात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माै.सावरगाव (मेट) ता.भोकर येथील भोसले कुटूंब १६ जून २०१७ रोजी शेतातील काम करुन सायंकाळी घरी परतले.काम करुन थकल्यामुळे लगेच झोपी गेले.याच रात्री दरम्यान सर्वजन झोपलेल्या अवस्थेत असतांना एका विषारी सापाने घरात प्रवेश केला व कु.सुरमा नथू भोसले (२७) हिला दंश केला.यामुळे तिला उपचारार्थ भोकर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.भोकर तहसिल कार्यालयातील सोनारी सज्जाचे तलाठी एस.जी.जगताप यांनी रुग्णालय व घटनास्थळी भेट दिली आणि रितसर पंचनामा केला आहे.सदरील पंचनाम्याचा अहवाल त्यांनी तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांच्याकडे सादर केला असून तहसिलदार मुंढे यांनी तो ” स्व.गोपीनाथ मुढे नैसर्गीक आपत्ती व अपघात विमा ” मंजूरीसाठी तात्काळ वरीष्ठांकडे पाठविला आहे.तसेच भोकर पोलीसांनी या प्रकरणी १७ जून रोजी आकस्मीत मृत्यूची नोंद केली असून या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related posts

बेदम मारहाणीत चोराचा मृत्यू, एक जण जखमी, जळगाव जिल्ह्यातील घटना

News Desk

भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान, पत्नी आणि मुलांचा गळा चिरला

News Desk

मनीष भंगाळेला पोलिस कोठडी,

News Desk