HW News Marathi
क्राइम

दमनची अवैध दारू किनवटमध्ये जप्त  

उत्तम बाबळे

नांदेड – केंद्रशासित राज्य असलेल्या दीव-दमनची अवैध दारू नांदेड जिल्ह्यातल्या किनवटमध्ये पोलिसांनी जप्त केली आहे. या दारूला दीव-दमनच्या बाहेर विकता येत नाही. मात्र, तरीही तस्करीच्या मार्गानं ती दारू किनवटमध्ये आणून विकली जात होती. त्यामुळं दारू तस्करीचं मोठ रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारु दुकानांवर बंदी घालण्यात आल्यामुळे अवैध दारु विक्रेत्यांनी दारु तस्करीच्या मार्गाचा सर्रास वापर सुरु केल्याचा प्रत्यय किनवट जिल्हा नांदेड येथे आला आहे. दारु तस्करांनी आपला तस्करीचा मोर्चा परप्रांतात वळविला असल्याचे नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यातून उघडकीस आले आहे.

१४ जून २०१७ रोजी या विशेष पोलीस पथाचे प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर, जगताप, खंदारे, पायनापल्ले, निरणे, आवातिरक आणि चालक देवकत्ते हे सर्व जण हिमायतनगर ते किनवट रस्त्याने गस्तीवर असतांना किनवट मध्ये विदेशी दारुची अवैधरित्या एक व्यक्ती विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने रात्री दहाच्या सुमारास किनवट शहरातील साठे नगर बस स्थानक परिसरातील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकून अवैध दारूचा सुमारे २६ हजार रूपये किमतीचा साठा जप्त केला. पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या राजेंद्र लक्ष्मण भातनासे (२७) अटक केलीय. त्याच्याकडे रॉयल चॅलेंज, मॅकडॉल, ऑफिसर्स चॉईस या दारूच्या बाटल्या सापडल्या. जप्त केलेल्या या दारूची महाराष्ट्रात विक्रीवर निर्बंध आहेत. “FOR SALE IN DAMAN ONLY ,NOT FOR SALE IN MAHARASHTRA ” असा मजकूर या जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांवर छापलेला आहे.

किनवट पोलिसांनी आरोपी विरोधात मुंबई दारु बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. राज्यात गुटखा बंदी असल्याने नांदेड जिल्ह्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश ,कर्नाटक या राज्यातून तस्करी मार्गाने गुटखा अवैध विक्रीसाठी येत असतांनाच परप्रांतीय दारु तस्करांचे रॅकेट सक्रीय झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या रॅकेटचा लवकरच शोध घेऊन त्यांना ही जेरबंद करुन असे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली”- किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

swarit

१४ वर्षाच्या तरुणाचा कोंबडीवर बलात्कार, हत्या

News Desk

11 कोटींचे डिल ठरले, 40 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारून तो आला कॅमेरासमोर

News Desk