HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव सांगा, मग चर्चा – काँग्रेस

नवी दिल्ली – भाजपचे नेते सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर आज गृहमंत्री राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव सांगा, जोपर्यंत नाव कळणार नाही, तोपर्यंत चर्चा करता येणार नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय.

सोनिया गांधी यांच्यासोबत राजनाथ सिंह आणि व्यंकय्या यांची चर्चा झाली त्यावेळी गुलाम नबी आजाद आणि मल्लिकार्जुन खड़गे उपस्थित होते. सोनिया गांधींच्या निवासस्थानी तीस मिनिटे ही चर्चा झाली. याबैठकीबाबत काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद म्हणाले, भाजप नेत्यांनी सोनिया गांधींना कोणतेही नाव नाही सांगितले. त्यांनी आम्हांला नावे विचारली. त्यांनी अद्याप नावांबाबत निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. अजुनही कोणतेही नाव नसल्याने चर्चा आणि सहकार्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खड़गे म्हणाले, जेव्हा ते नाव देतील तेव्हाच चर्चेला अर्थ असेल. नाव असल्याने कसलाच प्रश्न उपस्थित होत नाही. राजनाथ-व्यंकय्या यांच्याशी झालेल्या चर्चेतील मुख्य बाबी पक्ष आणि समितीसमोर ठेवण्यात येतील या विषयावर सर्वांचे मत विचारात घेतले जाईल. मोहन भागवत यांचे समर्थन करणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, राष्ट्रपती पदासाठी भागवत हे योग्य उमेदवार नाहीत. काँग्रेस एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. आम्ही आणि अन्य पक्ष भागवत यांचे समर्थन करु शकत नाही. आम्ही कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षातुनच उमेदवार निवडू, असे खडगे यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दोघींची आत्महत्या

News Desk

वेलकम फायटर ! ५ राफेल विमानांचे भारताच्या भूमीवर हॅपी लॅंडींग

News Desk

ममता बॅनर्जी नावाची एकटी वाघीण ‘भाजप’ला पुरून उरेल!

News Desk