HW News Marathi
देश / विदेश

मित्राच्या मदतीने पत्नीवर बलात्कार

हैद्राबाद येथील कांचनबाग परिसरात मित्राच्या मदतीने पत्नीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.आरोपी पती ऑस्ट्रेलियाचा रहिवाशी असून त्याच्या पत्नीची इच्छा नसतानाही जबरदस्ती तिच्यासोबत सेक्स केला.आणि त्याच्या मित्रालाही आपल्या पत्नीवर बलात्करा करण्यास मदत केली.याप्रकरणी महिलेने पती विरोधात कांचनबाग पोलिसा ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी पत्ती सलीमुद्दीनला अटक केली आहे.

कांचनबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मोहम्मद सलीमुद्दीन याचं 2016 मध्ये पीडित महिलेशी लग्न झालं होतं. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला होता. पत्नीसोबत व्हिडीओ चॅट करताना अनेकदा तो नग्न होण्याची मागणी करत असे. नग्न व्हिडीओही पाठवण्यास सांगत असे. पत्नीकडे दुसरा पर्याय नसल्याने ती व्हिडीओ पाठवत असे. सलीमुद्दीन हे सर्व व्हिडीओ आपल्या मित्रांना दाखवत असे’.13 फेब्रुवारी रोजी सलीमुद्दीन भारतात आल्यापासून पत्नीवर सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करत होता. काही दिवसांपुर्वी सलीमुद्दीन आपला मित्र चांदला घेऊन घरी गेला. आधी त्याने पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तिच्याशी शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. रुममध्ये अजून कोणीतरी आहे याची जाणीव पीडित महिलेला झाली. ती व्यक्ती चांद असल्याचा तिच्या लक्षात आलं. पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर सलीमुद्दीनने मित्राला तिच्यावर बलात्कार करण्याची परवानगी दिली. दुस-या दिवशी आपल्यावर बलात्कार झाल्याचं पीडित महिलेच्या लक्षात आलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ होणार ?

swarit

“…फक्त मोदींची दाढीच वाढतेय”, ममता बॅनर्जींचा मोदींना खोचक टोला!

News Desk

हैदराबादला पावसाने धुतले

News Desk