HW News Marathi
क्राइम

हदगाव येथील वैद्यकिय अधिक्षक, सेवक व चालकाला २५०० रुपयाची लाच स्विकारता एसीबी ने रंगेहात पकडले

उत्तम बाबळे नांदेड :- हदगाव येथील एका महिलेच्या प्रसूती व औषधोपचार बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच मागणा-या उप जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक, सेवक व चालकाला २५०० रुपयाची लाच स्विकारता एसीबी ने रंगेहात पकडले असून आरोग्य सेवा देणा-या वैद्यकिय क्षेत्रात ही भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रोवली गेल्याचे यातून उघड झाल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे. उप जिल्हा रुग्णालय हदगाव जि.नांदेड येथे एक महिला प्रसूत झाली होती.तिचे प्रसूती व औषधोपचार बिल मंजूर करण्यात यावे यासाठी त्या महिलेसह तिच्या पतीने रुग्णालयात अनेक चकरा मारल्या.परंतू त्या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी या दापत्त्यास लाच मागण्यात आली.वारंवार चकरा मारुन त्रासलेल्या या दांपत्त्याने अखेर पैसे देण्याचे कबूल केले व दि.२ मे २०१७ रोजी याबाबद पोलीस उप अधिक्षक ,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कार्यालय ,नांदेड येथे रितसर तक्रार दिली.या तक्रारीची एसीबी नांदेड पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले.यावरुन लाच लुचपच प्रतिबंधक विभाग कार्यालय नांदेड चे पोलीस अधिक्षक संजय लाठकर,उप अधिक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक एस.एस.पालांडे,पो.ना.साजीद अली,पो.ना.शेख चाँद,पो.काॅ.दिपक पवार,पो.काॅ.विलास राठोड,चालक पो.ना.माधव डूकरे यांनी दि.३ मे २०१७ रोजी उप जिल्हा रुग्णालय हदगाव येथे साफळा रचला व तक्रारदारास पैसे देऊन बिल मंजूरीसाठी स्वाक्षरी करण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक डाॅ.साहेबराव गणपतराव लोमटे (वर्ग – १)यांच्याकडे पाठविले असता तेथे अधिक्षकासह सेवक शेषेराव शंकर चव्हाण,अँब्युलन्स चालक मोहन निवृत्ती नवघडे यांनी बिल मंजुरी स्वाक्षरीसाठी २५००/- रुपयाची लाच त्यांच्या कडून स्विकारली.ही रक्कम स्विकारताच उपरोक्त एसीबी पथकाने लाच स्विकारणा-या या तिघांना रंगेहात पकडून जेरबंद केले. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार वै.अ.साहेबराव लोमटे,रा.कैलास नगर ,नांदेड,सेवक शेषेराव चव्हाण व चालक मोहन नवघडे दोघे ही रा.हदगाव या तिघांविरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्र. वि.पोलीस करत आहेत.रुग्ण सेवेच्या नावाखाली अशा काही लोकांकरवी लुट व भ्ष्टाचाराने कळस गाठला असून झालेल्या कार्यवाहीमुळे नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे ,तर भ्रष्ट अधिका-यांचे धाबे दणानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे – रामदास आठवले

News Desk

“माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम, मला माझ्या…,”

News Desk

हळदी समारंभात हवेत गोळीबार; नवरदेवासह मित्रांविरोधात गुन्हा दाखल

News Desk