उत्तम बाबळे
नांदेड :- वाहन चालक परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संगणक, इंटरनेट इत्यादी सुविधा तसेच ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा नाही अशा अर्जदारांसाठी शासनाने नागरी सुविधा केंद्राद्वारे (सीएससी) अर्ज भरण्याची व ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी सीएससी केंद्र चालकांना अर्जदाराकडून विहित शुल्का व्यतिरिक्त २० रुपये इतके शुल्क आकारुन अशा अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरुन देण्याची शासनाने परवानगी दिलेली आहे. आरटीओ कार्यालयातील कामकाज पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या केंद्रावरील सेवेचा लाभ घेऊन मध्यस्थविरहीत कार्यपद्धती निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व सीएससी केंद्राची माहिती www.apnacsconline.in/csc-
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.