बीड | राष्ट्रीय महामार्ग क्रं.548 B लातूर-अंबाजोगाई मार्गावर बर्दापूर ते वाघाळा दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी नुकतीच मागणी केल्याचे पत्र त्यांनी सामोरे आणले आहे. त्याअनुषंगाने सडक परिवहन मंत्रालयाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करत आहे, असे त्यांनी त्यांच्या ट्वीटर वरून नुकतेच ट्विट केले आहे.
स्थानिक पातळीवर संबंधित विभागांना चौपदरीकरणाचा प्रस्ताव देण्याच्या सुचना ही करणार आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देतील हा विश्वास असल्याचेही खासदार प्रीतम मुंडे यानी म्हटले आहे. मात्र, या रस्त्याच्या मुद्यावरून काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यच्या दौऱ्यावर असताना केज येथे आयोजित सभेत बोलताना बीड जिल्ह्यच्या खासदार डॉ प्रीतम मुंडेंवर टोला लगावला होता
अजित पवार नेमके ‘त्या’वेळी काय म्हणाले
केज येथे येडेश्वरी साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना अजित पवार म्हणाले होते, “मी जेव्हा लातूरहून केज या मार्गे मोटार गाडीने प्रवास करत होतो. तेव्हा लातूरपासून रस्ता हा 4 पदरी दिसत होता. मात्र, बीड जिल्ह्याची हद्द सुरू झाली की तोच रस्ता 2 पदरी झाला, असे कसे म्हणत खासदारांनी आपल्या जिल्ह्याच्या रस्स्त्यासाठी 4 पदरी रस्त्याची मागणी न केल्यामुळेच आज बीड जिल्हातील रस्ते हे 2 पदरी राहिले. जर राष्ट्रीय महामार्ग होत असताना खासदारांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केली नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात चौपदरी रस्ते होऊ शकले नाही खासदाराचे अपयश आहे, असे म्हणत अजित पवार यांनी थेट खासदार प्रीतम मुंडे यांच्यावरही निशाणा साधला होता. लातूरला 4 पादरी रस्ता आणि बीड ला 2 पदरी रस्ता हे खसदारांनी लक्ष देऊन केंद्रीय रस्ते मंत्री नियीन गडकारी यांच्याकडून आणणे गरजेचे होते. अजित पवार यांनी प्रीतम मुंडेंना त्या वेळी लगावला होता टोला. आणि याच रस्त्याच्या मुद्यावरून खासदार प्रीतम मुंडेंनी रस्त्याचे 4 पदरीकर करण्यासाठी नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.