HW News Marathi
क्राइम

पुण्यात सोनसाखळी टोळीला अटक

अभिराज उबाळे

पुणे – पुणे शहर गुन्हे शाखेने चेन स्नॅचिंग करणारी आंतरराज्य टोळी पकडून त्यांच्याकडून २२ चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील २८ लाख रु.चा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील यांनी दिली.

मुक्तार इराणी,वसीम पटेल,अलीरजा इराणी,इम्राण इराणी अशी या आरोपींची नावे आहेत.त्यांचेकडून दागिन्यांसह या गुन्ह्यांत वापरलेल्या ६ मोटरसायकल व ८ मोबाईल्सही जप्त करण्यात यश मिळाले आहे.या आरोपींवर चेनस्नॅचिंगचे यापूर्वीचे पुण्यात ५० गुन्हे व कर्नाटकात ३० गुन्हे दाखल आहेत तर इम्रानला कर्नाटकातील मलमारुती पो.स्टे.च्या ४ गुन्ह्यांत जन्मठेपेची शिक्षा झाली असून तेथूनही तो फरारी आहे.

गेल्या काही दिवसांपासून याबाबत गुप्तता बाळगून अत्यंत कौशल्याने ही कामगिरी यशस्वी करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

ही कामगिरी पो.उपायुक्त पी.आर.पाटील,सहा.आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट ३ चे पो.नि.सिताराम मोरे व त्यांच्या पथकाने केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमधील जैन मंदिरातून दोन किलो सोन्याची मूर्ती लंपास; पोलिसांकडून शोध सुरू

Aprna

गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

News Desk

माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना जीवे मारण्याची धमकी

News Desk