HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात नोटाबदलीच्या रॅकेटमधील 5 पोलिसांवर बडतर्फीची कारवाई

पुणे केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटाबदलीचे रॅकेट चालवणाऱ्या पुण्यातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेले सर्व कर्मचारी कोथरूड पोलीस ठाण्यातील आहेत.

२ फेब्रुवारी रोजी पुण्यातील कारवाईत काही व्यापाऱ्यांची रोकड जप्त करण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर ही संपूर्ण कारवाई निव्वळ एक बनाव असल्याचे समोर आले होते. यामधून पोलीस दलातीलच काही कर्मचारी नोटाबदलीचने रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झाले होते. पुण्यातील सुरेश अग्रवाल हा एजंट काही व्यापारांची पाचशे व हजार रूपयांची रोकड घेऊन ती बदलण्यासाठी चालला होता. यावेळी कोथरूड पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याच्या गाडीत होते. यावेळी पोलिसांनी बनावट कारवाईचे नाटक करत ही रोकड जप्त केल्याचे दाखविले होते. मात्र, सुरेश अग्रवाल याने नंतर केलेल्या खुलाशानुसार पोलिसांनी त्यावेळी ३ कोटींपेक्षा अधिकची रोकड पकडली होती. मात्र, कागदोपत्री त्यांनी केवळ २० लाख रूपयेच पकडल्याचे दाखविले. उर्वरित २ कोटी ८० लाख रूपयांची रक्कम या कर्मचाऱ्यांनी आपापसात वाटून घेतली. मात्र, पैशांच्या वाटणीवरून त्यांच्यातील अंतर्गत वाद निर्माण झाले होते. या वादातूनच ही संपूर्ण माहिती बाहेर उघड झाली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडूप आग प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी मागितली मृतांच्या कुटुंबीयांची माफी, कुटुंबीयांना ५ लाखाची मदत जाहीर

News Desk

विघ्नहर्त्याला ही प्लास्टिक बंदीचे विघ्न

News Desk

कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या बातम्या खोट्या । आनंदराज आंबेडकर

News Desk