HW News Marathi
राजकारण

…तर आयकर विभाग पंतप्रधान मोदींच्या घरावर छापा टाकणार का ?

नवी दिल्ली | तामिळनाडूमधील डीएमके पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयकर विभागावर निशाणा साधत त्यांना थेट सवाल केला आहे. “आयकर विभागाकडून सांगण्यात येते की संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच दुमई मुरगन यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. मग जर मी असे सांगितले कि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी करोडो रुपये आहेत. तर आयकर विभाग त्यांच्या घरावर छापा टाकणार का ?”, असा सवाल स्टॅलिन यांनी आयकर विभागाला विचारला आहे. ते कोयंबतूरमधील एका प्रचारसभेत बोलत होते.

आयकर विभागाने डीएमकेचे खजिनदार दुमई मुरुगन यांच्या घरावर निवडणुकीच्या काळात पैशांचा बेकायदा वापर केला जात असल्याच्या संशयावरुन छापा टाकला होता. त्यांच्या घरातून १० लाख रुपयांची रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयकर विभागावर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chhattisgarh Assembly Elections 2018 : मतदार यादीतून नावे गहाळ

News Desk

धनंजयराव राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती पैसे घेतले…

News Desk

…अन् आम्ही गुन्हेगार नसताना आमचे नाव ईडीत येते !

News Desk