HW News Marathi
राजकारण

मी माझ्या संपूर्ण प्रचार मोहिमेत सीपीएमविरोधात एकही शब्द बोलणार नाही !

वायनाड | “मी माझ्या संपूर्ण प्रचार मोहिमेत सीपीएमविरोधात एकही शब्द बोलणार नाही.” असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आज (४ एप्रिल) केरळच्या वायनाड येथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी आणि पूर्व उत्तर प्रदेशाचे महासचिव प्रियांका गांधी वॉड्रा यांनी रोड शोद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “सीपीएममधील बंधू आणि भगिनी आता माझ्याविरोधात बोलण्यास प्रारंभ करतील, पण मी माझ्या संपूर्ण प्रचार मोहिमेत सीपीएमविरोधात एकही शब्द बोलणार नाही.” तसेच राहुल पुढे म्हणाले, देश एकसंध आहे, हे सांगण्यासाठी मी केरळमध्ये आलो आहे. उत्तर असू दे, दक्षिण असू दे, किंवा पूर्व किंवा पश्चिम असूदे माझा हाच संदेश देण्यासाठी आलो आहे की पंतप्रधान मोदी आणि आरएसएस दक्षिणेकडील संस्कृती आणि भाषेवर अत्याचार करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू कश्मीरमध्ये भाजप पीडीपी युती संपुष्टात

News Desk

“विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Aprna

पुलवामा हल्ला नसून ती तर ‘दुर्घटना’

News Desk