मुंबई | “विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे. तसेच येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर पटोलेंनी आज (18 जून) पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला. ‘भाजपच्या वतीने किती अडथळा निर्माण केला तरी महाविकास आघाडीचे सहा उमेवदार जिंकतील’, असा विश्वासही पटोलेंनी त्यांनी व्यक्त केला आहे.
नाना पटोले म्हणाले, “अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहे. त्याचे रिपोर्टिंड आम्हाला येत आहे. ते कोणाशी बोलतात. काय चालल्याचे आहे. ज्यांच्याशी बोलतात आहे. ते आम्हाला सांगत आहे. त्यामुळे ते काय बोलतात. विरोधकांची वाक्य रचना काय आहे. केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे. याचा फायदा कसा घेतात. तपास यंत्रणांचा कसा दुरुपयोग चालू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कसे आमदारांना फोन लावतात. त्या सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती आहे. वेळ आली तर सगळ्या गोष्टींचा सामना करू. पण या पद्धतीचे लोकतंत्र होऊ शकत नाही. आता मतदानाच्या अधिकारापासून वंचित करण्याचे काम ज्या पद्धतीने चालल्याले आहे. खऱ्या अर्थाने मी मगाशी सांगितले की, आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीश आपल्याला न्याया मागण्यासाठी जेव्हा पत्रकार परिषद घेतात. आम्हाला संरक्षण पाहिजे, याचा अर्थ आपला देश कुठल्या दिशेला चाललेला आहे. याचा अंदाज सगळ्यांना येईला पाहिजे. आणि या सगळ्या व्यवस्थेला भाजपच्या वतीने किती अडथळा निर्माण केला तरी महाविकास आघाडीचे सहा उमेवदार जिंकतील, ” असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.
विधान परिषदेत पराभवाच्या भीतीने बोगस स्क्रिप्ट तयार
नाना पटोलेंच्या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “नाना पटोलेंच हे जे म्हणणे आहे. हे जवळ जवळ 20 तारखेचा निकाल लागल्याचे लक्षण आहे. नाना पटोलेजी 20 तारखेला काँग्रेस एक जागा हरल्यानंतर त्यांची कारणे जी सांगावी लागत आहेत. त्या कारणांची स्क्रिप्ट आताच तयार करत आहेत. अशा प्रकरणे नाना पटोलेंनी ही एक बोगस स्क्रिप्ट तयार केलेली आहे. त्यांनी ती पत्रकारांसमोर द्यावी.”