HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार मोदी सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार

– बॅंकांना दिल्या नाही 8600 कोटींच्या नव्या नोटा

कोल्हापूर – राज्यातील सहकारी बँकांनी नव्या नोटा आठ हजार सहाशे कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बँकेमध्ये जमा केल्या, मात्र अद्यापही त्या बदलून न दिल्याने मोदी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

राज्यातील सर्व सहकारी बँकांमधून आठ हजारर सहाशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्‍यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं याबाबत सरकारला काही निर्देश दिले आहेत. मात्र, त्या निर्देशांनुसार सरकारनं कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

8 सप्टेंबर 2016च्या नोटबंदीनंतर सहकारी बँकांना काही दिवस जुन्या नोटा स्विकारण्यास परवानगी देण्यात आली होती. या काळात सहकारी बॅंकांनी जुन्या नोटा स्विकारल्या होत्या. पण, नंतर ही परवानगी रद्द करण्यात आली. परिणामी बॅंकांमध्ये जुन्या नोटा पडून होत्या. त्या बदल्यात ग्राहकांना नव्या नोटा देता आल्या नाही. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकरण्याची परवानगी दिली, मात्र, नव्या नोटा देण्याची दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांकडून तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन

News Desk

‘भारतीय विद्या भवन’ ने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी केला! – देवेंद्र फडणवीस

Aprna

भर पावसात धैर्यशील मानेंचे दमदार भाषण

News Desk