HW News Marathi
मुंबई

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही ऐतिहासिक वाढ

मुंबई | नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स विक्रमी ३९,१११ अंकांवर उसळला होता. सलग तिसऱ्या दिवशी देखील सेन्सेक्सने उसळी कायम राहिली आहे. शेअर बाजाराने आज (३ एप्रिल) सेन्सेक्स ३९,२६३ वर स्थिरावला होता. तर निफ्टी ११,७५३ वर पोहचला आहे. यामुळे बँकिंग आणि ॲटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्समधील तेजीमुळे सेन्सेक्स सकाळच्या सत्रात १५० अंकांनी वधारला आहे. तर काल (२ एप्रिल) वाढ १८४ अंकांची होती. तर निफ्टी ११,७५२ वर बंद झाला होता.

टाटा मोटर्स, एचडीएफसी, पॉवर ग्रीड, कोटक बँक, टाटा स्टील, भारतीय एअरटेल, येस बँक, बजाज फायनान्स, एसबीआय यांच्या शेअर्समध्ये २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परकीय चलनाचा ओघ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याज दर कमी होण्याची अपेक्षा असून यामुळे बाजारात स्थिरता निर्माण होईल. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात ९ पैशांनी सुधारणा झाली आहे. सध्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ६८.६५ एवढे आहे. भारतासह शांघाय, टोकियो आणि सेऊल येथील शेअर बाजारातही उसळी घेतली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : काय आहे मुख्यमंत्र्यांचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन?

News Desk

धक्कादायक ! गियर म्हणून चक्क बांबूचा वापर

News Desk

सासरच्या मंडळींना मारहान केली म्हणून जावायाचा खून

News Desk