HW News Marathi
राजकारण

प्रकाश शेंडगे वंचित बहुजन आघाडीचे सांगलीतील नवे उमेदवार ?

सांगली | वंचित बहुजन आघाडीचा सांगलीचा उमेदवार बदलला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना वंचित आघाडीतून उमेदवारी देण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश शेंडगचे चुलत बंधू जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु राजकीय परिस्थिती पाहता अधिक सक्षम उमेदवार वंचित आघाडीकडून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक आज (३० मार्च) पार पडली असून या बैठकीत उमेदवारी बदलण्याच्या विषयवार चर्चा झाली आहे. या बैठकीत प्रकाश शेंडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पक्षाकडून आज याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात जवळपास चार लाखांच्या घरात धनगर समाजाचे मतदान होते. प्रकाश शेंडगे यांची ओळख ही धनगर समाज आणि ओबीसी नेते अशी आहे. तर सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचे मोठे आव्हान असणार आहे.

सांगलीची जागा काँग्रेसला की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा तिढा होता. अखेर ही जागा स्वाभिमानीच्या वाट्याला जागा गेली. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने उमेदवारांच्या बाबतीत चाचपणी सुरू आहे. भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर, वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील ही दोन नावे पुढे येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर केले सरकार स्थापन”, मुख्यमंत्र्यांचे विधान

Aprna

पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टीकरण देत म्हणाले…

Aprna

“झोपलेलं सरकार जागं होऊ दे…”; ‘मविआ’चे आमदार सरकारविरोधात आक्रमक

Aprna