HW News Marathi
राजकारण

पूनम महाजन यांनी चूक मान्य करावी, अन्यथा त्यांच्या प्रचारसभेत युवासेना सहभागी होणार नाही !

मुंबई | शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडली आहे. यांचे कारण युवासेना आणि उत्तर मध्य मुंबई भाजपची उमेदवार पूनम महाजन यांच्यामध्ये पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. पूनम महाजन यांच्या बॅनरवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज असून जो पर्यंत त्या त्यांची चूक मान्य करणार नाही. तो पर्यंत युवासेना पूनम महाजन यांच्या प्रचारसभेत सहभागी होणार तर नाहीच आणि प्रचार देखील करणार नसल्याची आक्रमक पवित्रा युवासेनेकडून घेण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे हे युथ आयकॉन आहेत. त्यांचा अपमान हा शिवसेनेचा अपमान असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे. उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंना डावलले जात आहे. या वृत्तीचा जाहीर निषेध करत आहे. त्यामुळे पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकत आहोत.

युवासैनिक पूनम महाजन यांच्या कुठलीही सभा आणि प्रचाराला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका युवासेनेकडून घेण्यात आली आहे. तसेच पूनम महाजन यांचा निषेध करण्यासाठी आज (३० मार्च) संध्याकाळी पाच वाजता युवासैनिक वांद्र्यातील शाखेत एकवटणार आहे. निवडणुकीची पुढील रणनिती ठरविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सवर्णांना मिळणाऱ्या १० टक्के आरक्षणाच्या विधेयकावर सायंकाळी चर्चा

News Desk

लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा! – नाना पटोले

Aprna

चंद्रपूर शहरामध्ये मनसे कडुन सरकार व शिक्षण विभाग चा निषेध करण्यात आला.

News Desk