HW News Marathi
मुंबई

ओमी कालानीचा भाजपा प्रवेश धमाका ठरणार की फुसका बार?

गौतम वाघ

प्रदेश नेते,कोअर कमिटी आमने सामने,

.तर. राष्ट्रवादीउल्हासनगरातून नामशेष

उल्हासनगर, गेल्या काही महिन्या पासून ज्या ओमी कालानीच्या भोवती उल्हासनगरचे राजकारण फिरत आहे,ते ओमी भाजपात प्रवेश करत असल्याच्या वावळयांनी वातावरण ढवळून निघाले आहे.येत्या एखाद दोन दिवसांत ओमी यांच्या भाजपा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार असा दावा केला जात असतानाच,कोअर कमिटीचा विरोधही आहे.ते पाहता ओमी कालानीचा भाजपा प्रवेश धमाका ठरणार कि फुसका बार?याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून गेले आहे.

> > राष्ट्रवादी नेते गणेश नाईक यांनी ओमी कालानी यांना कोणत्या पक्षाशी युती करावी यासोबतच उमेदवार ठरवण्याचे अधिकार बहाल केले आहेत.त्यानुसार टीम ओमी कालानीच्या बॅनर खाली ओमीने 45 उमेदवारांच्या नावांची यादी जाहिर केली आहे.त्यात काँग्रेसचे नगरसेवक राजेश वधारिया,साई पक्षाचे नगरसेवक सुजित चक्रवर्ती,रिपाइं आठवले गटाच्या नगरसेविका आशा बि-हाडे, जात पडताळनीत पद रद्द झालेल्या काँग्रेस नगरसेविका दिप्ती दुधानी,कांचन उदासी,माजी नगरसेवक मोहन गाडो,सुरेश गायकवाड,माजी नगरसेविका सुरेखा वेलकर,आणि विशेष म्हणजे प्रथम भाजपात गेलेल्या साई पक्षाच्या नगरसेविका जयश्री पाटील यांनी टीम ओमी कालानीत प्रवेश केला आहे.

> > एकीकडे कालानी कडे प्रवेशाचा ओढ असतानाच,ओमी भाजपाकडे आकृष्ट आहेत.थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्कात असल्याचा दावा ओमी करत असून सर्व अटी शर्ती मान्य झाल्यावर भाजपात प्रवेश करणार.असे स्पष्ट करणारे ओमी यांनी जे सिटिंग नगरसेवका व्यतिरिक्त जे उमेदवार जाहिर केलेत,त्यांना तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न असणार.अशीही भूमिका घेतली आहे.

मात्र एकीकडे ओमी भाजपा प्रवेशासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतानाच,भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी,प्रवक्ते राजा गेमनानी,मीना आयलानी,मंगला चांडा,नरेंद्र राजानी,लाल पंजाबी,राजा वानखेडे,जमनू पुरस्वानी,संजय सिंह,या कोअर कमिटीने ओमी प्रवेशास नकार केला आहे.प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक निर्णय हे कोअर कमिटी घेणार.असे जाहीर केलेले आहे.असे असतानाही ओमीला प्रवेश मिळणार काय?प्रवेशाचा धमाका होणार काय?कि वरूनही नकारघंटा मिळून ओमीचा प्रवेश फुसका बार ठरणार?हा उल्हासनगरात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान ओमीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूळे प्रवेश मिळालाच तर उल्हासनगरातून राष्ट्रवादी नामशेष होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निर्णायक सभे नंतर ज्योती कालानी ह्या आमदार म्हणून निवडून आल्या.आताही ज्या रीतीने टीम ओमी कालानी कडे प्रवेशाचा ओघ आहे तो,राष्ट्रवादीचे तिकीट मिळणार याच विचाराने.राष्ट्रवादीच्या घडयाळवरच निवडणुक लढवली जाणार असे ओमीनेही पत्रकारांशी बोलताना जाहीर केले होते.मात्र ओमी भाजपात गेल्यास राष्ट्रवादीचे काय?हा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

News Desk

अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलाचा मृतदेह रेल्वेरुळावर

News Desk

मराठी उद्योजकांनो स्वत:च्या व्यवसायाचे मार्केटिंग करा- आशिष पेठे

News Desk