HW News Marathi
मुंबई

जि.प. निवडणुकीसाठी सेनेच्या मंत्र्यांनी झोकून द्यावे – उद्धव ठाकरे

 

शुभम देशमाने

मुंबई – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रचार दौरे केले नव्हते, त्याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी प्रचारात झोकून देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. शुक्रवारी मातोश्रीवर झालेल्या शिवसेना मंत्र्यांची उद्धव यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीत शिवसेना युतीत सहभागी असेल किंवा नसेल मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीचा आढावा उद्धव यांनी यावेळी घेतला. बैठकीत उद्धव यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय होऊन ग्रामीण भागात प्रचारसभा घेण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तळागाळात जाऊन प्रचार करावा लागणार आहे. या निवडणुकींवर स्वतः उद्धव ठाकरे लक्ष ठेवणार असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.

या बैठकीला शिवसेनेचे रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक सावंत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर हे मंत्री उपस्थित होते. तर खासदार अनिल देसाई, आमदार सुनिल प्रभू, अनिल परब, अजय चौधरी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माथाडी कामगारांचा आजपासून बेमुदत बंद

News Desk

विकासकांचा ३४० ते ४२० चौरस फुटांच्या घरांकडे ओढा

News Desk

महापौरांसमोर पालिकेच्या मुख्य अभियंत्याला शिवसैनिकांनी केली मारहाण

News Desk